Ad will apear here
Next
हस्तकलेतील नवदुर्गांद्वारे ‘नवरंग’ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : वेगवेगळ्या हस्तकलांमध्ये पारंगत असणाऱ्या नऊ महिला कलाकारांनी ‘नवरंग’ या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पत्रकारनगर येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे बुधवार, नऊ ते रविवार, १३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

‘नवरंग’ या हस्तकला प्रदर्शनात श्रुती भागडीकर, श्यामला लोणकर, दीप्ती बावणे, दीपाली पाठक, अनन्या बोस, अर्चना कुलकर्णी, प्रीतम तुळशीबागवाले, सोनाली राणे, प्रणाली पारसनीस या नऊ महिला कलाकार आपल्या पर्यावरणपूरक व टिकाऊ कलाकृती येथे प्रदर्शित करणार आहेत. यात चांदीचे व क्रोशाचे दागिने, ड्रेस मटेरीयल्स, बॅग्ज आणि सौंदर्य प्रसाधने, सिरॅमिकची भांडी, बागेतील शोभेच्या वस्तू येथे बघायला मिळतील.


श्रुती भागडीकर या चांदी आणि खड्यांपासून दागिने बनवतात. ‘झुमका ज्वेलरी’ या संकेतस्थळावर हे दागिने उपलब्ध आहेत. ‘आयओरा क्रिएशन्स’च्या श्यामला लोणकर हाताने पेंटिंग केलेले अभ्रे, पिशव्या, टेबलक्लॉथ अशा वस्तू बनवतात. दीप्ती बावणे ‘मृदा’ या नावांतर्गत रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी आणि शोभेच्या वस्तू तयार करतात. दीपाली पाठक या ‘क्राफ्टझोन’ नावाने क्रोशाच्या वस्तू आणि दागिने बनवतात.

प्रणाली पारसनीस ‘प्रज्योत क्रिएशन्स’ अंतर्गत हाताने पेंटिंग केलेली ड्रेस मटेरिअल्स, तंजोर पेंटिंग, इजिप्शियन पेंटिंग, पॉटरी, ग्लास पेंटिंग यांची विक्री करतात. अनन्या बोस यांच्या ‘म्रीदा’ या नावांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तू बनवतात. अर्चना कुलकर्णी या ‘निर्विघ्न’ या नावांतर्गत जैविक साबण, शाम्पू आदी आंघोळीस उपयुक्त सौंदर्य प्रसाधने बनवतात. प्रीतम तुळशीबागवाले ‘थार’ या नावाने शोभेचे किंवा खेळण्यातील प्राणी, घरातील बागेच्या सुशोभिकरणाच्या वस्तू, घरात लावता येण्यासारखी झाडे, जैविक घटक वाढविणाऱ्या बॅग्ज आदी वस्तू बनवतात. सोनाली राणे या ‘सोनचाफा’ अंतर्गत विविध प्रकारच्या कापडी बॅग्ज, जॅकेट, कापडी दागिने आदी बनवतात. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZZJCF
Similar Posts
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
ठिपक्यांच्या रांगोळीतून साकारल्या नवदुर्गा पुणे : नवरात्र महोत्सवात दुर्गा देवीची नानाविध रूपातील पूजा बांधली जाते. देवीची ही रूपे मन प्रसन्न करून जातात. अशी देवीची नऊ वेगवेगळी रूपे ठिपक्यांच्या रांगोळीतून साकारली आहेत पुण्यातील कथक नृत्यांगना अबोली धायरकर यांनी.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे २९ सप्टेंबरला उद्घाटन पुणे : ‘कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सांस्कृतिक पुण्याच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन यंदा विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांच्या हस्ते रविवार, २९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ४
पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन ‘कारीगर हाट’ पुणे : वैविध्यपूर्ण पारंपरिक हस्तकलांचे अप्रतिम नमुने बघण्याची आणि खरेदी करण्याची संधी पुणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे. हस्त कारीगर या दिल्लीतील संस्थेतर्फे ‘कारीगर हाट’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language